|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पुरामुळे बँकेतील रक्कम गेली पाण्यात

पुरामुळे बँकेतील रक्कम गेली पाण्यात 

महत्त्वाच्या कागदपत्रांसह  संगणकीय यंत्रणा, फर्निचरचे नुकसान

बाळेपुंद्री

: धुवाधार पडलेल्या पावसामुळे बेळगाव जिल्हय़ात हाहाकार माजला होता.  नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सौंदत्ती तालुक्यातील मिनी खडेबाजार म्हणून ओळखल्या जाणाऱया मुनवळी गावालाही मोठा फटका बसला आहे. बँकेतील नोटाही भिजून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मलप्रभा नदीला आलेल्या पुरामुळे गावातील घराघरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच लाखो रुपयांचे नुकसानही झाले आहे. येथील सिंडिकेट बँकेतही पाणी शिरल्याने बँकेची यंत्रणा तसेच लाखो रुपये पाण्यात भिजले आहेत. यात दहा ते दोन हजारपर्यंतच्या  नोटांचा समावेश आहे. बँक असलेल्या इमारतीत सुमारे पाच ते सहा फुटापर्यंत पाणी आले होते. यात रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे, संगणकीय यंत्रणा, एटीएम प्रिंटर आणि फर्निचर बुडाल्याने नुकसान झाले आहे.

 

Related posts: