|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 22 कोटीची विकास कामे राबविण्यासाठी लवकरच निविदा

22 कोटीची विकास कामे राबविण्यासाठी लवकरच निविदा 

बेळगाव / प्रतिनिधी

शहरात विविध विकास कामे राबविण्यासाठी शासनाकडून 14 व्या वित्त निधी अनुदानामधून 22 कोटीचा निधी महापालिकेला मंजुर झाला आहे. या अंतर्गत विविध विकास कामे राबविण्यासाठी करण्यात आलेल्या  कृती आराखडय़ाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या खजिन्यात ठणठणाट असल्याने मागील वर्षभरात कोणतीच विकास कामे राबविण्यात आली नाहीत. मार्च महिन्यात महापालिकेला 14 व्या वित्त निधी आनुदानांतर्गत 22 कोटीचा निधी मंजूर झाला होता. या निधीमधुन प्रत्येक वॉर्डमध्ये 20 लाखाची कामे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याकरिता कृती आराखडा करून प्रशासकीय मंजुरीसाठी देण्यात आला होता. या कृती आराखडय़ाला शासनाकडून मंजुरी मिळाली असून, विकास कामे राबविण्यासाठी एस्टिमेट करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लागलीच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे 22 कोटी निधी अंतर्गत राबविण्यात येणारी विकास कामे पावसाळय़ानंतर मार्गी लागण्याची शक्मयता आहे.

पावसामुळे शहरातील रस्त्यांची दैना झाली आहे. ठिकठिकाणी गटारी देखील मोडकळीस आल्या आहेत. यामुळे ही विकास कामे राबविणे आवश्यक आहे. रस्ते खूपच खराब झाले असल्याने वाहन धारकांचे हाल होत आहेत. यामुळे महापालिकेकडून राबविण्यात येणाऱया विकास कामांमध्ये रस्ते निर्माण करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. याकरिता सध्या मंजूर झालेला निधी देखील अपुरा पडण्याची शक्मयता आहे. ही विकास कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच कृती आराखडा करून प्रशासनाकडे पाठविण्याची गरज आहे.

Related posts: