|Saturday, December 14, 2019
You are here: Home » leadingnews » 15 ऑगस्टनंतर जम्मू-काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार

15 ऑगस्टनंतर जम्मू-काश्मीरमधील निर्बंध शिथिल करणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविण्यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव घालण्यात आलेले निर्बंध 15 ऑगस्टनंतर शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली आहे.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवून लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला आहे. कलम 370 हटवण्यापूर्वी केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात काही निर्बंध घातले होते. मात्र कलम 370 हटवल्यानंतर हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. परंतु 15 ऑगस्टनंतर हे निर्बध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यानंतर आठवडाभरात राज्यातील परिस्थिती सामान्य होईल, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

Related posts: