|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Automobiles » ऑटोमोबाईलमध्ये मंदीचे सावट; 15 हजार कर्मचाऱयांनी गमावली नोकरी

ऑटोमोबाईलमध्ये मंदीचे सावट; 15 हजार कर्मचाऱयांनी गमावली नोकरी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मागील 19 वर्षात पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले आहे. अर्थव्यवस्थेत घसरण झाल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी निर्माण झाली असून, मागील तीन महिन्यात 15 हजार कामगारांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने प्रसिद्ध केलेल्या ‘एसआयएएम’ च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

वाहन क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे मागील आठवडय़ात टाटा मोटर्सने उत्पादन थांबविले होते. त्यानंतर मारुतीनेही 1000 कर्मचाऱयांची कपात केली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मंदीचा विळखा वाढू लागल्याचे संकेत मिळत आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचे सावट दूर न झाल्यास अनेक कामगारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्र 3.7 कोटी जणांना रोजगार उपलब्ध करून देते.

सन 2018 मध्ये 22 लाख 45 हजार 224 गाडय़ांची विक्री झाली होती. यंदा मात्र ही विक्री 18 लाख 25 हजार 148 च्या नीचांकी पातळीवर आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात जीएसटीचे दर 28 टक्के आहेत, ते दर तात्काळ 18 टक्के करण्यात यावेत, अशी मागणी ऑटो इंडस्ट्रीकडून करण्यात आली आहे.

Related posts: