|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » पूरग्रस्तांच्या मदतीत सचिन तेंडूलकरची धाव

पूरग्रस्तांच्या मदतीत सचिन तेंडूलकरची धाव 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महापुराचा फटका बसलेल्या कोल्हापूर आणि सांगलीकरांच्या मदतीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही धावून आला आहे.

आठ दिवस पुराच्या वेढय़ाने संपूर्ण संसार नष्ट झालेल्या कोल्हापूर आणि सांगलीकरांच्या मदतीला अनेक सेवाभावी संस्था, आसपासची गावे, मराठी कलाकारांसह, बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही मदतीचा हात पुढे केला. क्रिकेटपटू अजिंक्मय रहाणनेही कोल्हापूर व सांगलीतील लोकांना मदत केली. रहाणेनंतर आता क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही पूरग्रस्तांना मदत केली आहे.

सचिनने इतरांनाही मदतीचे आवाहन केले आहे. सचिनने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ‘भारतातील अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. पण, आता परिस्थिती हळुहळू पुर्वपदावर येत आहे. तेथील लोकांना मदतीची गरज आहे. पंतप्रधान मदत निधीमार्फत मी पूरग्रस्तांना मदत केली आहे. तुम्हीही तुमच्या ऐपतीप्रमाणे पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन सचिनने ट्विटरद्वारे केले आहे.

Related posts: