|Saturday, December 14, 2019
You are here: Home » Top News » ‘चांद्रयान-2’ने पृथ्वीची कक्षा सोडली; चंद्राच्या हद्दीत प्रवेश

‘चांद्रयान-2’ने पृथ्वीची कक्षा सोडली; चंद्राच्या हद्दीत प्रवेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अवकाशात सोडलेल्या ‘चांद्रयान-2’ने प्रवासाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 2 वाजून 21 मिनिटांनी ‘चांद्रयान-2’ पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले. त्यानंतर यानाने चंद्राच्या दिशेने वाटचाल केली आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी ’चांद्रयान-2’ पुढील प्रवासाबद्दल माहिती दिली.

सिवान म्हणाले, ‘चांद्रयान-2’ पृथ्वीची पक्षा सोडण्यापूर्वी इस्रोने ‘ट्रान्स लूनार इंजेक्शन’ हा किचकट प्रयोग केला. चंद्राच्या बाह्य कक्षेत सहज प्रवेश व्हावा म्हणून यानातील लिक्विड इंजिन अंदाजे 1,203 सेकंदापर्यंत फायर केले गेले. त्यानंतर 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहिलेल्या चांद्रयानाने चंद्राच्या हद्दीत प्रवेश केला. ‘चांद्रयान-2’ हे चंद्राच्या वाटेवर सहा दिवस असेल आणि सुमारे 4.1 लाख किलोमीटरचा प्रवास करून 20 ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल, असेही सिवान यांनी सांगितले.

Related posts: