|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » खून प्रकरणातील फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द

खून प्रकरणातील फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

दुकान मालकाने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून त्याच्या मुलाचे अपहरण करून खून करणाऱया आरोपीची सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्द केली.

त्याबरोबरच दुसऱया एका आरोपीची जन्मठेपेची शिक्षाही उच्च न्यायालयाने रद्द करुन दोन आरोपींची निर्दोष सुटका केली.

सन 2012 मध्ये धारावीतील दुकान मालक राजेश भांगडे यांनी कामावरुन काढून टाकल्याने इम्तियाज शेख आणि आझाद मेहमुदुल्ला अन्सारी यांनी भांगडे यांचा मुलगा श्री याचे अपहरण करुन त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका मॅनहोलमध्ये टाकला होता. या प्रकरणी सत्र न्यायालयाने मे 2018 मध्ये इम्तियाजला फाशी आणि अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने इम्तियाजची फाशी आणि अन्सारीची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली.

Related posts: