|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » स्वातंत्रदिन पूरग्रस्तांची मदत करून साजरा करू : उर्मिला मातोंडकर

स्वातंत्रदिन पूरग्रस्तांची मदत करून साजरा करू : उर्मिला मातोंडकर 

ऑनलाइन टीम /मुंबई : 

राज्यातील कोल्हापूर-सांगली भागात महापूराने थैमान घातले होते. पूर ओसरत असला तरी येथील परिस्थिती सावरण्यास वेळ लागणार आहे. सध्या विविध संस्था, दानशूर व्यक्ती. सेवाभावी संस्था, राजकीय, सामाजिक, चित्रपट क्षेत्रातील लोक मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. अशात पूरग्रस्तांसाठी मदत करावी असे आवाहान बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने केले आहे.

महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, गडचिरोली आदी भागातील पूरस्थिती भीषण होती. पूरग्रस्तांसाठी जितकी करू तितकी कमीच पडणार आहे. साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे तसेच आपणही आपल्या या समाजासाठी मदत करावी. येणारा स्वातंत्रदिन पूरग्रस्तांसाठी साजरा करावा, तुमच्याकडून होईल ती मदत करावी असे आवाहन उर्मिलाने केले आहे.