|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » बेळगावचे प्रकाश जाधव यांना मरणोत्तर ‘कीर्तीचक्र’

बेळगावचे प्रकाश जाधव यांना मरणोत्तर ‘कीर्तीचक्र’ 

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली : 

जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे सीमारेषेवर भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना खात्मा केला. परंतु, या चकमकीत बेळगावातील निपाणी जवळील बुध्याळमधील जवान प्रकाश जाधव शहीद झाले. शहीद जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर किर्ती चक्र जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रतिवषीप्रमाणे यंदाही शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

प्रकाश जाधव 27 नोव्हेंबर 2018 रोजी काश्मीरमधील कुलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. शहीद प्रकाश जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. जाधव यांचे वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत.