|Monday, December 16, 2019
You are here: Home » Top News » कोयनेतून 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोयनेतून 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग 

ऑनलाइन टीम / कोल्हापूर : 

राधनगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून 27 हजार 017 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पंचगंगा पाटबंधरे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी आज, मंगळवारी दिली.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱयाजवळील पाणी पातळी 43 फूट असून, एकूण 53 बंधरे पाण्याखाली आहेत. राधनगरी धरणात आजअखेर 8.24 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात 105.872 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 100.96 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

 

Related posts: