|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » ‘रक्षाबंधन’साठी एसटीकडून विशेष वाहतुक सेवा

‘रक्षाबंधन’साठी एसटीकडून विशेष वाहतुक सेवा 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

‘रक्षाबंधन’ सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी एसटी बसस्थानके, बस थांबे येथे अधिकाऱयांच्या देखरेखीखाली कर्मचाऱयांची नियुक्ती करुन प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्यत येईल.

या दिवशी प्रवासी वाहतूकीची प्रचंड गर्दी होत असते हे ओळखून एसटीने यंदा आगार पातळीवर मार्गनिहाय जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. सुरक्षित प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे उद्दष्टि एसटी प्रशासनाने ठेवली आहे. त्यासाठी प्रमुख बसस्थानकावर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी प्रवाशी मित्र, तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱया मार्गस्थ निवाऱयावर जादा वाहतूकीची माहिती देण्यासाठी एसटी कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दिवशी सर्व एसटी कर्मचारी रजा न घेता अहोरात्र काम करुन प्रवाशांना सुरक्षित व वक्तशिर सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतील.

 

Related posts: