|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » मकरंद कुलकर्णी यांना 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

मकरंद कुलकर्णी यांना 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी 

ऑनलाईन टीम / पुणे :

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी यांचा भाऊ मकरंद कुलकर्णी यांना न्यायालयाने 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुंतवणुकदारांची 230 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या नातेवाईकांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. डीएसकेंचे भाऊ मकरंद हे डीएसके यांच्या कंपनीचे प्रवर्तक होते. पोलिसांनी त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस काढली होती. पोलीस त्यांचा शोध घेत हेते. दरम्यान, अमेरिकेला पळून जाण्याच्या तयारीत असताना काल मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. आज मकरंद कुलकर्णी यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related posts: