|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » Top News » सांगली : प्रकाश आंबेडकरांनी घेतले ‘ब्रम्हनाळ’ गाव दत्तक

सांगली : प्रकाश आंबेडकरांनी घेतले ‘ब्रम्हनाळ’ गाव दत्तक 

ऑनलाइन टीम / सांगली : 

सांगली जिह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसले असतांना स्थानिक गावकऱयांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या गावावर शोककळा पसरलेली आहे. याच पुरग्रस्त गावाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतले आहे.

पुरग्रस्त ब्रम्हनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. ब्रम्हनाळ गावात बोट अपघातात काही नागरिकांचे निधन झाले होते. या संकट काळात ब्रम्हनाळ गाव प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतल्याचे कळताच गावचे संरपंच व गावकऱयांनी समाधनी व्यक्त केलं आहे. ग्रामपंचायतीने पत्र देऊन आम्ही पुनर्वसनासाठी आमचे गांव देत आहोत असं जाहीर केले आहे.

 

Related posts: