|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » महसूल विभागाकडून पूरग्रस्तांना मदत सुरू

महसूल विभागाकडून पूरग्रस्तांना मदत सुरू 

ऑनलाइन टीम / कोल्हापूर : 

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून पंचनामा करण्यास सुरुवात झाली आहे. पुरामुळे अनेक लोक बाधित झाले असून नुकसान भरपाई म्हणून शासनाने प्राथमिक स्तरावर 5 हजार रुपये रोख स्वरुपात देण्याचे ठरविले आहे. तर उर्वरित 10 हजार रक्कम पूरग्रस्तांच्या बँकेत जमा केली जाणार आहे.

कोल्हापूरातील काही भागात महसूल विभागाकडून मदत वाटप सुरु झालं आहे. पूरग्रस्तांना शहरात 15 हजार आणि ग्रामीण भागात 10 हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तर ग्रामीण भागात 10 हजाराव्यतिरिक्त जमिनीचे पैसे, मृत जनावरांची नुकसान भरपाई आणि पिकाचे पैसे देणार असल्याचं सरकारने सांगितले आहे. यासाठी राज्य सरकारने 2 हजार 88 कोटी रुपये निधी प्रस्तावित केला आहे.