|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » नथुराम गोडसेला मानणारे लोक मला ही मारू शकतात : असदुद्दीन ओवेसी

नथुराम गोडसेला मानणारे लोक मला ही मारू शकतात : असदुद्दीन ओवेसी 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

नथुराम गोडसेला मानणारे लोक माझी हत्या करु शकतात असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. अफवा पसरवण्यासाठी पाकिस्तानला मदत करत आहात या आरोपावर उत्तर देताना ओवेसींनी हे विधान केले. एक दिवस कोणी तरी मला गोळी मारेल असे वाटते. गोडसेच्या विचारसरणीला मानणारे लोक माझ्याबरोबर असे करु शकतात. आपल्या देशात आजही गोडसेला मानणारे लोक आहेत असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

जम्मू -काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याच्या मुद्यावरुन पंतप्रधन नरेंद्र मोदी सरकारवर विरोधी पक्षाचे नेते हल्लाबोल करत आहेत. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावरुन एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी केंद्र सरकारवर टीका केली.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, मी एक खासदार आहे. मात्र, मला अरुणाचल प्रदेश किंवा लक्षद्विपला जाण्यासाठी परवानगी द्यावी लागते. त्याचप्रमाणे, आसाममध्ये मी जमीन खरेदी करु शकतो का? असा सवाल केला. तसेच, सध्या जे जम्मू-काश्मीरसोबत झाले आहे. तसेच, नागालँड, मिझोरम, मणिपूर, आसाम आणि हिमाचल प्रदेशातील लोकांसोबत होऊ शकते.

 

Related posts: