|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » आमचं लष्कर तयार : इम्रान खान यांची धमकी

आमचं लष्कर तयार : इम्रान खान यांची धमकी 

ऑनलाइन टीम / इस्लामाबाद : 

भारताला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आमचं लष्कर तयार आहे अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस 14 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधत इम्रान खान हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आले होते. मुझ्झफराबाद या ठिकाणी त्यांनी भाषण केले. त्या भाषणात पाकिस्तानची लढाई एका विचारधारेविरोधत आहे. ही विचारधारा भयंकर आहे असं म्हणत त्यांनी भाजपावर आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. पुलवामानंतर भारतानं बालाकोटची मोहीम आखली होती. त्याप्रमाणेच आता ते लवकरच पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठीही प्रयत्न करतील.

भारतानं असं काही केल्यास आम्हीही युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं इम्रान खान म्हणाले आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध झाल्यास त्याला संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल. पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा हा जगातल्या प्रत्येक स्तरावर उपस्थित करत राहील. गरज पडल्यास आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाऊ, येत्या काळात लंडनमध्ये मोठी रॅली काढण्यात येणार आहे. एकीकडे संयुक्त राष्ट्राची महासभा सुरू असेल, तर दुसरीकडे पाकिस्तान विरोध प्रदर्शन करेल. पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर सैरभैर झालेला असून, त्यांनी पुन्हा एकदा भाषणातून भारताला लक्ष्य केलं आहे.

 

Related posts: