|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » मिका सिंह अडचणीत : गाणे गाण्यास बंदी

मिका सिंह अडचणीत : गाणे गाण्यास बंदी 

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली : 

बॉलिवूड गायक मिका सिंहला पाकिस्तानमध्ये एका लग्नात परफॉर्म करणे महागात पडले आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने त्याच्यावर गाणे गाण्यास बंदी घातली आहे. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाकिस्तानमध्ये एक परफॉर्मन्सचा होता. आता व्हिडिओ समोर आल्यानंतर मिका सिंहवर जोरदार टिका होत आहे.

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. सुरेश श्यामलाल गुप्ता म्हणाले, मिकाचे मुव्ही प्रोडक्शन हाऊस, म्युझिक कंपनी आणि ऑनलाईन कंटेंट प्रोव्हायडरसोबत मिकाच्या सर्व कॉन्ट्रक्ट्सना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय, असोसिएशनने मिकाचे सर्व चित्रपट, गाणी आणि एंटरटेनमेंट कंपनीसोबत काम करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.