|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » शेतकऱयांच्या कर्जफेडीची मुदत वाढवा : राहुल गांधी

शेतकऱयांच्या कर्जफेडीची मुदत वाढवा : राहुल गांधी 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

केरळमधील शेतकऱयांना कर्जाची परतफेड करण्यासाठीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांना लिहिले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी वायनाड येथील पुरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन पंतप्रधन नरेंद्र मोदी यांना केले.

राहुल गांधी यांनी पत्रात केरळच्या शेतकऱयांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. सुमारे एक वर्षापूर्वी केरळमध्ये शतकातील सर्वांत भीषण महापूर आला होता. केरळमधील पुरामुळे शेतकऱयांचे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून पिके नष्ट झाली आहेत. केरळमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा अचानक वाढला आहे. त्यामुळे शेतकऱयांना कर्जाची परतफेड करण्याची मुदत डिसेंबर 2019 पर्यंत वाढवून देण्यात यावी, असे मी रिझर्व बँकेस आवाहन करतो, असे राहुल गांधी यांनी पत्रात लिहिले आहे.

 

Related posts: