|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » पहलू खान हत्या : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

पहलू खान हत्या : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता 

ऑनलाइन टीम  / जयपूर  : 

देशभरात गाजलेल्या राजस्थानमधील पहलू खान झुडबळी प्रकरणातील सर्व सहा आरोपींची अलवर जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पहलू खान हत्येप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील तिघे अल्पवयीन होते. 1 एप्रिल 2017 रोजी गोतस्करीच्या संशयावरून कथित गोरक्षकांनी पहलू खानला बेदम मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे पहलू खानचा मुलगा इरशादने सांगितले.

एप्रिल 2017 मध्ये हरियाणाच्या जयसिंहपुराचा रहिवासी असलेला पहलू खान आपल्या मुलांसहीत आणि भाच्यांसहीत हटवाडाहून गायींना दोन गाडय़ांमध्ये घेऊन आपल्या गावी निघाला होता. रस्त्यातच कथित गोरक्षकांनी त्यांचा रस्ता अडवत गोतस्करीच्या संशयावरून त्यांना मारहाण केली. यामध्ये पहलू खान गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

 

Related posts: