सिंगापूरचा शादो ग्रुप गुंतवणार 70 कोटी

तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे ध्येय
सिंगापूर
मुळची सिंगापूरचा असणारा शादो गुप तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यासाठी लवकरच पुण्यातील कारखान्यात 1 कोटी डॉलर (70 कोटी रुपय)s गुंतवणार असल्याची घोषणा केली आहे. यावर आधारीत बेंगळूर मध्ये तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांचे प्रदर्शन भरवणार असल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ मार्कण्ड यांनी दिली आहे. येणाऱया काळात देशातील मुख्य बाजारपेठेमध्ये एरिक ब्रॅण्डच्या नावानी या तीनचाकी वाहनांना उतरणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. याकरीताच पुण्यातील एका कारखान्यात आम्ही 1 कोटी डॉलर गुंतवण्याची योजना तयार करणार आहे. देशाच्या अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी आगामी काळात सदरच्या उत्पादनाचे निर्यात कण्याचे ध्येय निश्चित करणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी सध्या सिंगापूर आणि मलक्का या ठिकाणी संशोधन केंद्राची उभारणी केलेली असून त्यासोबतच बेंगळूर येथेही अशा केंद्राची सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले आहे.
उत्पादनाचे ध्येय
पुण्यातील कारखान्यामधून प्रत्येक महिन्याला एक हजार इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार असून सदरची वाहने ही शहरी वातावरणाचे स्थिती लक्षात घेऊनच तयार करण्रयात येणार असल्याची माहिती मार्कण्डेय यांनी यावेळी दिली आहे.