|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » मुकेश अंबानीच्या संपत्तीत 31595 कोटीने वाढ

मुकेश अंबानीच्या संपत्तीत 31595 कोटीने वाढ 

श्रीमंताच्या यादीत 15 व्या स्थानी झेप

मुंबई

  देशासोबत आशियामधील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी यांना जगभरात ओळखले जाते. सध्या त्यांच्या एकूण संपत्तीत 4.45 अब्ज डॉलर(31595 कोटी रुपये) इतक्या प्रमाणात नफा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या कामगिरीसोबत अंबानी यांनी ब्लूमबर्ग या यादीत 18 स्थानी झेप घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे.

जगभरात सर्वात धनाढय़ लोकांची यादी प्रत्येक दिवसाला अपडेट केली जाते. त्यात मंगळवारी सादर केलेल्या ब्लूमबर्गच्या निर्देशाकानुसार अंबानी यांची एकूण संपत्ती 49.9 अब्ज डॉलर्सच्या (3.45 लाख कोटी) घरात गेल्याची नोंद केली आहे. या कामगिरीच्या नोंदीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात तेजीचे वातावरण निर्माण झाले होते. याचाच फायदा कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

ब्लूमबर्ग बिलेनियरकडून सादर करण्यात आलेल्या निर्देशांकानुसार मुकेश अंबानी यांचा जगभरातील श्रीमंताच्या यादीत सोमवार पर्यंत त्यांचा 18 वा नंबर लागत होता. परंतु मंगळवारी सुधारीत यादी सादर केल्यावर त्याचे स्थान 15 व्या स्थानी झेप घेतल्याची नोंद करण्यात आली.

शेअर बाजारातील कामगिरी

मंगळवारी श्रीमंत लोकांची सुधारीत यादी सादर करण्यात आल्यावर मुंबई शेअर बाजारात 10 टक्क्यांनी वधारत जात 1,275 रुपयावर बंद झाला.