|Monday, December 9, 2019
You are here: Home » उद्योग » चीनच्या औद्योगिक उत्पादनात घसरण

चीनच्या औद्योगिक उत्पादनात घसरण 

पेइचिंग

  चीनमध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर हा काही प्रमाणात वाढलेला राहणार असल्याचे संकेत नोंदवले होते. परंतु या सर्व अंदाजाना तडा देत जूनमध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर 6.30 टक्क्यावर राहिला असल्याची माहिती ब्लूमबर्गच्या सर्वेक्षणातून सांगितले आहे. तर जुलै महिन्यात ही घसरण 4.80 टक्क्यावर कायम रहिल्याचे पहावयास मिळाले आहे. या अगोदर उपलब्ध माहितीनुसार हा वृद्धीदर 6 टक्क्यावर राहणार असल्याचे म्हटले होते. परंतु तसे काही झाले नसल्याचे दिसून आले आहे. चीनमध्ये  किरकोळ विक्रीत 9.80 टक्क्यावरुन घसरण होत 7.60 टक्क्यावर जुलैमध्ये पोहोचल्याची नोंद करण्यात आली.  ही गेल्या 17 वर्षांच्या कालावधीनंतर प्रथम झाली असल्याची माहिती बुधवारी सादर केलेल्या आकडेवारीतून सांगितले आहे. दीर्घ कालावधीच्या गुंतवणूक वृद्धी दरातही घसरण होत 5.70 टक्क्यावर आल्याचे नोंदवले आहे.

 

Related posts: