|Monday, December 16, 2019
You are here: Home » उद्योग » शेअर बाजारातील घसरणीला अखेर ब्रेक

शेअर बाजारातील घसरणीला अखेर ब्रेक 

सेन्सेक्स 353 अंकानी मजबूत : निफ्टी 11,000 वर

वृत्तसंस्था/मुंबई

मुंबई शेअर बाजारात सोमवारी बकरी ईदमुळे सुट्टी होती. त्यामुळे मंगळवारी नेहमीप्रमाणे बाजारात सुरु झाला परंतु आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे बाजार जवळपास 600 हून अधिक अंकानी घसरल्याची नोंद करण्यात आली. तर दुसऱया दिवशी म्हणजे बुधवारी मुंबई बाजाराने घसरणीला 353 अंकानी मजबूती नोंदवत ब्रेक लावल्याचे पहावयास मिळाले. दिवसभरतील व्यवहारात आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि इन्फोसिस यांचे समभाग तेजीत राहिलेत. तर आशिया बाजारातही तेजीच्या वातावरणाची नोंद करण्यात आली.

देशांतर्गत झालेल्या सकारात्मक कामगिरीचा बुधवारी मुंबई बाजाराला फायदा झाला आहे. यातील मुख्य कंपन्याचा सेन्सेक्स 353.37 अंकानी वधारत 37,311.53 वर निर्देशांक बंद झाला. तर दिवसभरातील व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 37,473.61 ची उच्चांकी पातळी गाठली तर 37,000.77 वर निच्चांकी कामगिरीची नोंद करण्यात आली. याउलट राष्ट्रीय शेअर बाजारतील निफ्टी 103.55 अंकानी झेप घेत 11,029.40 वर स्थिरावला आहे.

मुख्य कंपन्यांमध्ये बुधवारी वेदान्ता, टाटा स्टील, येस बँक, टेक महिंद्रा, हीरोमोटो कॉर्प, भारती एअरटेल, स्टेट बँक, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक यांचे समभाग 4.83 टक्क्यांनी वधारल्याची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सन फार्मा, ओएनजीसी, कोटक महिंद्रा बँक, टाटा मोटर्स, एशियन पेन्टस, एचसीएल टेक आणि एनटीपीसी यांचे समभाग मात्र 4.58 टक्क्यांनी घसरलेत.

आशिया बाजारात उत्साहात

आशिया बाजारात गुंतवणूकादारांच्या उत्साही वातावरणाचा फायदा भारतीय बाजाराला बुधवारी झाल्याचे पहावयास मिळाले आहे. तरी आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजाराला सुट्टी राहणार असल्यामुळे शुक्रवारी बाजाराचा काय राहणार आहे. ते पाहणेच योग्य ठरणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

Related posts: