|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीची नयन सुर्वे सीए परीक्षेत देशात 44 वी

रत्नागिरीची नयन सुर्वे सीए परीक्षेत देशात 44 वी 

रत्नागिरी / प्रतिनिधी

दि इन्स्टिटय़ुट ऍाफ चार्टर्ड अकाऊटस ऍाफ इंडियामार्फत मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फायनल आणि फांउडेशन परीक्षेचा निकाल ऍानलाईन जाहीर झाला आह़े रत्नागिरीच्या नयन सुर्वे हिने देशात 44 वा क्रमांक प्राप्त करून जिह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

 नयन सुबोध सुर्वे ही शहरालगत एमआयडीसी येथील रहिवासी आहे. तिचे शालेय शिक्षण फाटक प्रशाला तर अकरावी-बारावीचे शिक्षण अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात झाले.  नववीत असतानाच सीए होण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे 12 वीनंतर सीए अभ्यासाला सुरूवात केली. आर्टीकलशिप सुरू केली. यामध्ये सीए ऍथनी राजशेखर यांची मोलाची मदत झाली आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा, भाऊ मधुरच्या प्रोत्साहनामुळे यश मिळवणे सोपे गेले. आपण यशस्वी होणार हा विश्वास होता मात्र देशात 44 वा क्रमांक येण्याचा विचार केला नव्हता असे नयन ‘तरूण भारत’शी बोलताना म्हणाली.

 तीन वर्ष सतत केवळ अभ्यास केला. कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात, सहलींमध्ये सहभाग घेतला नाही. बऱयाच क्षणीक आनंदाच्या गोष्टींपासून लांब राहिले.  नुसती घोकंपट्टी न करता समजून घेण्यावर भर दिला, असे नयन म्हणाली. प्रयत्नातील सातत्य जपण्याचे आवाहनही तिने तरूणवर्गाला केले. नयन आपले महाविद्यालयीन शिक्षण बहिस्थ विद्यार्थी म्हणून करत असून यंदा ती बीकॉमच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देणार आहे. अभ्यासाव्यतिरिक्त तिला बुध्दिबळ खेळाची आवड आहे.

Related posts: