|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पिंपर येथे प्रौढाचा खून

पिंपर येथे प्रौढाचा खून 

वार्ताहर/ कोतळूक

गुहागर तालुक्यातील पिंपर-मटवाडी येथील 49 वर्षीय प्रौढाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. डोक्यावर चार वर्मी वार बसल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी हे वार कोयत्याचे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

अनंत विश्राम देवळे असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे. देवळे हे पूर्वी दुबईमध्ये व त्यानंतर काही वर्षे मुंबई येथे कामाला होते. दोन वर्षापूर्वीपासून ते पिंपर येथे आपली मुलगी व मुलग्यासह रहात होते. त्यांची पत्नी दोन वर्षापासून मुंबई येथे वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे 10.30 वाजता ते झोपले. मुलगी शृंगारतळी येथे शाळेत जात असल्याने पहाटे 5 चा गजर लावण्यात आला होता. मात्र पहाटे वडील गजर बंद का करत नाहीत म्हणून ती पहावयास गेली, असता ते तिथे नव्हते. ते कुठेच न सापडल्याने तिने मुंबई येथे आईला फोन लावला. आईने अनंत यांच्या पिंपरमध्येच रहात असलेल्या बहिणीला कळवले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला असता ते घराच्या जवळच मृत स्थितीत आढळून आले.

देवळे यांच्या कपाळावर 3 तर डोक्याच्या मागे मोठा उभा वार आढळून आला. मागील वार एवढा निर्दयी होता की, त्यातून मेंदू दिसत होता. घटनेची खबर कळताच पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक तपासात या खूनाचे नेमके कारण  स्पष्ट झालेले नाही. अधिक तपासासाठी श्वानपथकही बोलावण्यात आले आहे.

Related posts: