|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » 250 बोटींनी घेतला जयगड बंदराचा आश्रय

250 बोटींनी घेतला जयगड बंदराचा आश्रय 

केतन पिलणकर/ रत्नागिरी

मासेमारीवरील बंदी 1 ऍागस्ट रोजी उठली, मात्र मुसळधार पाऊस व खोल समुद्रातील वादळसदृश परिस्थितीमुळे मासेमारीसाठी गेलेल्या रायगड, मुंबई येथील नौकांना फटका बसला आह़े यातील सुमारे 250 नौका जयगड बंदरात आश्रयाला आल्या आहेत़

विशेषत: रेवस, उरण व मुंबई येथील नौकांनी जयगड बंदरात आश्रय घेतल़ा आहे. या नौकांवर मोठय़ा प्रमाणात मासळी असल्यामुळे त्यांनी ती जयगड बंदरात विक्री करण्याचा निर्णय घेतल़ा ही गोष्ट स्थानिक मच्छिमारांना समजताच त्यांनी याला तीव्र विरोध केल़ा  यातून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱयांनी जयगड व आजूबाजूच्या बंदरात मासळी न विकण्याची सूचना केली. यानुसार मत्स्य विभागाने परजिल्हय़ातील मच्छिमारांना मासळी न उतरवण्याचा आदेश दिला आह़े

अनुकूल वातावरणानंतर ‘त्या’ नौका आपल्या जिल्हय़ात जातील

स्थानिक मच्छिमारांच्या विरोधानंतर परजिल्हय़ातील नौकांना येथे मासळी न उतरवण्याचे आदेश दिले आहेत़   समुद्रातील वातावरण अनुकूल झाल्यानंतर या नौका पुन्हा आपल्या जिल्हय़ात जातील़, असे सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रवीण सुर्वे यांनी सांगितले.

Related posts: