|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अभाविप, भाजयुमो प्रणीत गटामध्ये यादवी

अभाविप, भाजयुमो प्रणीत गटामध्ये यादवी 

प्रतिनिधी/ पणजी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा प्रणित गटांमध्ये गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणूक मुद्दय़ावरून यादवी सुरू झाली असून महिला पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी नोंद झाल्या आहेत.

गेली अनेक वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यापीठ मंडळाच्या निवडणुकीत बाजी मारत आली होती. गोव्यात भाजप सरकार आल्यापासून भाजप युवा मार्चाने या निवडणुकीत भाग घेतला आणि विद्यार्थी परिषदेने माघार घेतली होती. या दोन्ही समविचारी संघटनेने काँग्रेस प्रणीत एनएसयुआय या संघटनेला आव्हान दिले होते. यंदाच्या निवडणुकीत अनेक वर्षांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आपल्या अस्तित्वाची जाणी होऊन त्यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले व राजकीय प्रणीत गटाला निवडणुकीत भाग घेण्यास मज्जाव करावा, अशी मागणी विद्यापीठ निबंधकांकडे केली.

भाजप युवा मोर्चा हा राजकीय पक्षाचा गट आहे व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एनएसयुआय या दोन विद्यार्थी संघटना आहेत. फक्त विद्यार्थी संघटनांचा विचार व्हावा अशी मागणी अभाविपने केली होती.

यासंबंधी पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटाला बोलावले होते. राजकीय बॅनर लावून विद्यापीठासमोर घोषणाबाजी चालू होती. त्याचे चित्रिकरण करण्याचा प्रयत्न काही अभाविप विद्यार्थी नेत्यांनी केल्यावर दोन्ही गटात बरीच धुमचक्री झाली. मारामारीचे हे प्रकरण आता पोलीस स्थानकात पोहोचले आहे. मारहाण तसेच मोबाईल चोरीचा आरोपही लावण्यात आला आहे.

दोघांची तक्रार

अभाविपच्या पूजन प्रियोळकर आणि प्रभा नाईक यांनी महिला पोलीस स्थानकात तक्रार दिली असून मारहाण व मोबाईल हिसकावून घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. 16 ऑगस्ट रोजी विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका होणार असून त्यावेळी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Related posts: