|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अग्नीशामक दलाच्या जवानांना बांधली राखी

अग्नीशामक दलाच्या जवानांना बांधली राखी 

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हय़ात झालेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे विविध सैन्य दलांसोबत अग्निशमक दलाच्या जवानांनीही पुरग्रस्तांना वाचविण्यासाठी पुढाकार घेऊन आपले कार्य चोख बजाविले आहे. त्यामुळे शिवप्रति÷ान हिंदूस्थान यांच्यावतीने अग्निशमक दलाच्या जवानांचा सत्कार व महिला समुहाच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून राखी बांधण्याचा संयुक्त कार्यक्रम बुधवारी सायंकाळी अग्निशमन कार्यालयासमोर पार पडला.

प्रारंभी शिवप्रति÷ान हिंदुस्थानच्या धारकऱयांनी ध्येय मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी शिवप्रति÷ान हिंदूस्थानचे बेळगाव जिल्हाध्यक्ष किरण गावडे, डी. बी. पाटील, सागर मुतगेकर, डिस्ट्रिक्ट अधिकारी शिवकुमार स्वामी. स्टेशन अधिकारी वेंकटेश टक्केकर, सि. डी. माने आदी उपस्थित होते.

यावेळी शिवप्रति÷ान हिंदुस्थानच्या महिला समुहातर्फे अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधून औक्षण करण्यात आले. त्यानंतर रोपटी देऊन जवानांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अंकुश केसरकर, मिथिल जाधव, गजानन बाडिवाले. गजानन पाटील, सागर लाखे, विजय बाडिवाले, अमोल केसरकर, नितीन कुलकर्णी, प्रफुल शिरवळकर, प्रविण शिरवळकर, नेहा बाडिवाले, वैष्णवी धामणेकर, शुभांगी दिवटे, आरती जांबडेकर, अंजली चौगुले, मानसी गुरव, पद्मप्रसाद हुली. रेणू मोरे आदी उपस्थित होते.

 

Related posts: