|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्वातंत्र्यदिनासाठी शहर सज्ज

स्वातंत्र्यदिनासाठी शहर सज्ज 

बेळगाव / प्रतिनिधी

73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या स्वागतासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. त्याचे प्रतिबिंब बाजारपेठेतही उमटल्याचे दिसून आले.

शहरातील प्रत्येक शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी करण्यात आली असून बेळगाव परिसरातील शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालये यासह इतर प्रशासकीय यंत्रणा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत तिरंगी ध्वज, बॅचिस, ओढणी, टी-शर्ट यासह वेगवेगळे नवीन नमुने तिरंगी रंगामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन एकाच दिवशी असल्याने बाजारात राखी तसेच तिरंगी झेंडे घेण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.

Related posts: