|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नव्याने संसार उभे करण्याचे आव्हान

नव्याने संसार उभे करण्याचे आव्हान 

वार्ताहर/ कुडची

कृष्णा नदीची पाणीपातळी संथगतीने ओसरू लागली आहे. यामुळे प्रशासन व पूरग्रस्तांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे. मात्र आता विस्कटलेला संसार नव्याने  उभे करण्याचे आव्हान कृष्णा काठावरील पूरग्रस्तांसमोर उभे ठाकले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पाण्याच्या पातळीत घट होत आहे. अद्यापही काठावरील सर्वच रस्ते बंद आहेत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. तसेच जसजसे पाणी ओसरेल तसे अनेक दिवसांपासून पाण्यात राहिलेल्या घरांची पडझड होत आहे. त्यामुळे पाणी उतरेपर्यंत किती घरे पडतील याची भीती पूरग्रस्तांतून व्यक्त होत आहे. पाणी कमी होत असल्याने नागरिक आपली घरे व साहित्याची स्वच्छता करण्यासाठी गर्दी करत आहेत. याचबरोबर पाणी येऊन गेलेल्या भागात कचऱयाचे ढीग दिसून येत आहेत. या कचऱयामुळे मोठी दुर्गंधी पसरत असून प्रशासनासमोर आरोग्य सेवेची मोठी समस्या उद्भवणार आहे. स्वच्छतेला अधिक प्राधान्य देण्याची गरज असून पाणी ओसरल्यानंतरच शेतीच्या नुकसानीचा व पडलेल्या घरांचा सर्व्हे होणार आहे. त्यामुळे नेमके किती नुकसान झाले याची खरी आकडेवारी काही दिवसानंतर समजणार आहे.

Related posts: