|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत मेट्रोविरोधात शिवसेनेच्या आमदाराचा ठिय्या

मुंबईत मेट्रोविरोधात शिवसेनेच्या आमदाराचा ठिय्या 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मेट्रो कारशेडच्या कामामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्डयांच्या निषेधार्थ मुंबईतील मानखुर्द येथे शिवसेनेने आंदोलन केले आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एमएमआरडीएने नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी, या मागणीसाठी स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी चक्क चिखलात ठिय्या मांडला आहे.

मेट्रोच्या कामामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. मानखुर्दमध्येही मेट्रोच्या कारशेडचे काम जोरदार सुरु आहे. बोगद्यांची खोदकामे, खांबांची उभारणी यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक वळविण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यातून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली असून मुंबईकर त्रस्त आहेत.

याबाबत स्थानिक नागरिकांनी आमदार काते यांच्याकडे तक्रार केली. काते यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत चिखलातच ठिय्या आंदोलन सुरु केले.

Related posts: