|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » आम्हांला जनावरांप्रमाणे बंद ठेवलंय : मेहबुबा मुफ्तींच्या मुलीचे अमित शहांना पत्र

आम्हांला जनावरांप्रमाणे बंद ठेवलंय : मेहबुबा मुफ्तींच्या मुलीचे अमित शहांना पत्र 

 

ऑनलाइन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटविण्यासाठी खलबते सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड मोठय़ा प्रमाणात सुरक्षा दलांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. कलम 370 हद्दपार करण्यात आल्यानंतर इंटरनेट, मोबाईल, लँडलाईन सेवा पूर्णपणे ठप्प करण्यात आली आहे. राज्यात अजूनही कलम 144 लागू आहे.

या सर्व परिस्थितीवर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा जावेद यांनी या परिस्थितीला वाचा फोडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. इल्तिजा सुद्धा घरामध्ये नजरकैदेत आहे. त्यांच्या मातोश्री आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

इल्तिजा आपल्या पत्रात म्हणते, संपूर्ण देश स्वातंत्र्य दिनाचा आनंद घेत असताना काश्मिरींना जनावरांप्रमाणे बंद करून ठेवण्यात आले आहे. त्यांना मानवाधिकारापासून वंचित ठेवले जात आहे. मी पुन्हा बोलले, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकीही देण्यात येत आहे.

 

Related posts: