|Monday, December 9, 2019
You are here: Home » मनोरंजन » सैफ अली खानला बर्थ डे गिफ्ट : ‘लाल कप्तान’ चा फर्स्ट लुक रिलीज

सैफ अली खानला बर्थ डे गिफ्ट : ‘लाल कप्तान’ चा फर्स्ट लुक रिलीज 

ऑनलाइन टीम /मुंबई : 

सैफ अली खान आज, शुक्रवारी 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. जन्मदिनाच्या औचित्याने ‘लाल कप्तान’च्या मेकर्सकडून सैफ अली खान ला खास गिफ्ट मिळालं आहे.

लाल कप्तानच्या निर्मात्यांनी ‘लाल कप्तान’ चा फर्स्ट लुक रिलीज केला. लाल कप्तान चित्रपटामध्ये सैफ अली खान नागा साधुच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या 36 सेकंदाच्या टीजरमध्ये सैफ आपल्या चेहऱयावर भस्म लावताना दिसून येत आहे. सैफ अली खानचा लुक आणि दमदार डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

सैफ आपल्या दमदार आवाजात म्हणतो, हर राम का अपना रावण, हर राम का अपना दशहरा. हा चित्रपट यावषी दसऱयाच्या मुहूर्तावर 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

 

Related posts: