|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » दोन पीकविमा कंपन्यांना 682 कोटींचा पहिला हप्ता

दोन पीकविमा कंपन्यांना 682 कोटींचा पहिला हप्ता 

 ऑनलाईन टीम / पुणे :

पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या दोन विमा कंपन्यांना राज्याच्या कृषी विभागाने 682 कोटी, 29 लाख, 56 हजार, 694 रुपयांचा पहिला हप्ता उपलब्ध करुन दिला आहे.

राज्यात खरीप हंगामातील पिकांसाठी काढण्यात आलेल्या विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसताना देखील, आवश्यक बाब म्हणून ही रक्कम अदा करण्यात आली आहे.

ही योजना राबविण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आणि बजाज अलियान्स इन्शुरन्स कंपनी या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या खरिप हंगामाअंतर्गत दोन्ही कंपन्यांनी मागील हंगामाच्या एकूण अदा केलेल्या राज्याच्या हिश्याच्या विमा हप्ता अनुदानाच्या 80 टक्क्याच्या 50 टक्के रक्कम अदा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या दोन्ही कंपन्यांनी एकूण 707 कोटी, 2 लाख, 75 हजार, 658 एवढ्या रकमेची मागणी केली होती. त्यापैकी 68 कोटी, 29 लाख, 56 हजार, 694 रुपयांचा पहिला हप्ता उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या रक्कमेवर कृषी आयुक्तालयाच्या वतीने नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाणार आहे. केंद्र व राज्याच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱयांना आधार देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. यंदा या योजनेत सहभागी होण्याकरिता 31 जुलै 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरातील एक कोटींपेक्षा अधिक शेतकऱयांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.