|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » डॉ.दाभोलकर खूनप्रकरणाचे सूत्रधार कधी पकडले जाणार?

डॉ.दाभोलकर खूनप्रकरणाचे सूत्रधार कधी पकडले जाणार? 

 

  येत्या 20 ऑगस्टला पुण्यात ‘जवाब दो’ आंदोलन

पुणे / प्रतिनिधी :

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 20 ऑगस्ट रोजी सहा वर्षे होत आली तरी सूत्रधार पकडलेले नाही. त्यामुळे हे सूत्रधार कधी पकडले जाणार, असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

सूत्रधार पकडले जात नाहीत, तोपर्यंत मारेकरी तयार केले जातील. सरकारने सूत्रधारापर्यंत पोहोचले पाहिजे. गौरी लंकेश व कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासामध्ये आरोपपत्र दाखल झाले. मात्र दाभोलकर आणि पानसरे यांच्या खुनाचा तपास थांबला आहे. आरोपपत्र कधी दाखल होणार ? असा प्रश्न हमीद यांनी विचारला.

सीबीआयने मारेकरी पकडले तरी यंत्रणा सूत्रधारांपर्यंत पोहोचलेल्या नाही. विचारातून चौघांना संपवले, असा उल्लेख समोर आला आहे. दाभोलकरांना मारले ते शस्त्र मुंबईजवळील खाडीमध्ये टाकले तरी शोधकाम झाले नाही. पर्यावरणाचे कारण देण्यात आले. मारेकऱयांना जामीन मिळू लागला आहे. अमोल काळे, अमित दिग्वेकर यांच्यावर आरोपपत्र दाखल दाखल नाही. व्यापक कटाचा भाग समोर आला, पण ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता आले नाही. सहा वर्षे थोडा कालावधी नाही, यावर त्यांनी बोट ठेवले.

20 ऑगस्टला अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन

डॉक्टर दाभोलकरांवर ज्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळय़ा झाडण्यात आल्या त्या ठिकाणी 19 तारखेला संध्याकाळी सात वाजता कॅण्डल मार्चद्वारे अभिवादन केले जाणार आहे तसेच 20 तारखेला सकाळी 9 वाजता ‘सूत्रधार कधी पकडणार – जबाब दो’ आंदोलन केले जाणार आहे, तर संध्याकाळी 5.30 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे जे÷ पत्रकार आणि संपादक एन. राम हे ‘वर्तमान भारताच्या समोरची तीन आव्हाने विवेकावरील हल्ला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने आणि जन समुहांच्या वंचिततेचे वास्तव’ याविषयावर नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यान देणार आहेत

Related posts: