|Monday, December 16, 2019
You are here: Home » क्रिडा » पुणेरी पलटन करणार इंटर-क्लब कबड्डी स्पर्धेचे आयोजन

पुणेरी पलटन करणार इंटर-क्लब कबड्डी स्पर्धेचे आयोजन 

पुणे / प्रतिनिधी : 

सर्वांपर्यंत युवांचे टॅलेंट पोचावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱया पुणेरी पलटणतर्फे महाराष्ट्रात औरंगाबाद, नाशिक आणि पुणे अशा तीन शहरांमध्ये ‘बोल कबड्डी’ या इंटर-क्लब कबड्डी टुर्नामेंस्चे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी यासाठी पुणेरी पलटनने यंदा पुण्याबरोबरच औरंगाबाद आणि नाशिक या भागातील खेळाडूंनाही व्यासपीठ मिळावे हा या मागील मुख्य हेतू असेल.

पुणेरी पलटणने आयपीअंतर्गत बोल कबड्डी या कबड्डीच्या टुर्नामेंस् आयोजित केल्या आहेत. या खेळातील प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून या स्पर्धा भरवण्यात येत आहेत. यंदा ‘बोल कबड्डी’ अंतर्गत पुणेरी पलटणतर्फे इंटर-क्लब कबड्डी टुर्नामेंस् महाराष्ट्रातील विविध भागात आयोजित करण्यात येत आहेत. 17 ऑगस्ट 2019पासून सुरू होणाऱया या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून तब्बल 45 क्लब सहभागी होणार आहेत. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी औरंगाबादेतील प्रोझोन मॉल येथून 24 टीमच्या सहभागाने या स्पर्धेच्या पहिल्या फेरीला सुरुवात होईल. ही चॅम्पियनशिप औरंगाबाद कबड्डी फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. चॅम्पियनशिपची दुसरी आणि तिसरी फेरी अनुक्रमे नाशिक आणि पुणे येथे घेतली जाईल.

Related posts: