|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » लाच घेताना नाशिक कृषी बाजार समितीच्या सभापतीला अटक

लाच घेताना नाशिक कृषी बाजार समितीच्या सभापतीला अटक 

ऑनलाइन टीम / नाशिक : 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक अधीक्षक सुनील कडासने यांनी 3 लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक केली. नाशिक मध्ये शिवाजी चुंबळे यांच्या अटकेमुळे राजकीय वातावरणात चर्चेला चांगलेच उधण आले आहे.

चुंबळे यांनी, कामावर परत रुजु करतो, असे सांगत, कर्मचाऱया कडे 10 लाख रुपये लाच मागितली होती पण शेवटी 3 लाख रूपयांवर व्यवहार ठरला. या घटनेची माहिती त्या कर्मचाऱयांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला याबाबत माहिती दिली. एसीबीचे अधीक्षक कडासने यांनी ट्रप लावुन चुंबळे यांना रंगेहाथ पैसे घेताना अटक केली. अशा प्रकारच्या घटना याआधी बाजार समितीचे सभापती असताना माजी खासदार देविदास पिंगळे यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतरची अशी ही दुसरी घटना आहे.

चुंबळे यांच्या पत्नी शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका आहेत व शिवाजी चुंबळे पुर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणुन निवडून आले होते.

 

Related posts: