|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पूर हटला : कचरा हटेना

पूर हटला : कचरा हटेना 

कचरा निर्मुलनासाठी प्रयत्नांची शर्थ : धर्माधिकारी प्रतिष्ठान ताकद लावणार : वीज, पाणी आणि दूरध्वनी सुरु

प्रतिनिधी/ सांगली

महापूर व पुराचे पाणी हटले. लाईट-पाणी-फोन सुरु झाले. हजारो हात आणि बारा नगरपालिका राबत आहेत. प्रयत्नांची शर्थ सुरु आहे. पण, शहरातील कचरा-दुर्गंधी हटेना. कोलमडलेला व्यापार कसा सावरायचा सुरु करायचा हा प्रश्न सतावतो आहे. दरम्यान, मदत व पंचनामे कामाला गती आली आहे. सांगली जिह्यातील पूर बाधित व्यापाऱयांनी शंभर टक्के कर्जमाफीची मागणी आहे.

कृष्णा पात्रात गेली. महापूर ओसरला तथापि महापुराने जे तांडव केले. ते निस्तरताना सर्वांची दमछाक झाली आहे. राज्यातील डझनभर पालिका-महापलिकेचे सातशे कर्मचारी, त्यांची यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि पूर बाधित सांगलीकर व त्यांचे मित्र असे अक्षरशः हजारो हात स्वच्छतेसाठी राबत आहेत. मदत व स्वच्छता कामात चमकोगिरीही सुरु आहे. तथापि राबणारे, मदत करणारे हजारो हात असूनही कचरा हटेना.

सांगलीतून बुधवार आणि गुरुवार दोन दिवस सुमारे हजार टन कचरा उठाव झाला. तरीही तितकाच कचारा अजून शिल्लक आहे. महापुरात घरदार सोडून बाहेर गेलेले परत येत आहेत. घर उघडले की गाडीभर कचरा बाहेर येतो आहे. गाद्या, उशा, कपडे, भांडीकुंडी, धान्य, टी.व्ही., फ्रीज, संगणक सगळे निरुपयोगी झाले आहे. दुकानदार, शाळा महाविद्यालये, वाचनालये, मोबाईल शॉपी, चपलाची कपडय़ांची दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. रस्त्यावर पडलेला कचरा उचलला की तेथे पुन्हा तेवढाच ढीग लागतो आहे. शहरातील दुर्गंधी कमी होईना. मनपाच्यावतीने जंतूनाशक फवारणी होते आहे. पण, जंतूनाशक प्रभावी वापरा, अशी मागणी आहे.

महापुराच्या या संकटात वीजमंडळ व कर्मचाऱयांनी उत्तम कामगिरी बजावत शहरातील 20 टक्के मीटर बदलून वीज सुरु केली. पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी वीज पुरवठा सुरु करुन दिली. मनपाने शहरातील पाणीपुरवठा सुरु केला आहे. सोमवारपासून शाळा-महाविद्यालये व जनजीवन सुरु होईल, असा अंदाज असला तरी जिह्यातील साडेतीन-चार हजार घरांची पडझड झाली आहे. व्यापार-उद्योग-शेती उद्ध्वस्त झाली आहे. घरे बांधून द्या, शेती व व्यापाऱयाला शंभर टक्के कर्जमाफी द्या आणि शेती व व्यापार यासाठी सवलतीचा व सत्वर कर्जपुरवठा करा, अशी मागणी होते आहे.

एकीकडे मदत, बचाव, स्वच्छता, पंचनामे, सानूग्रह अनुदान अशी कामे सुरु आहेत. तर दुसरीकडे चमकोगिरी व ‘ह्याला बदला, त्याला आणा’ अशा मागण्या सुरु आहेत. शासनाने लातूर भूकंपातील अनुभवी प्रवीणसिंग परदेशी यांची विशेष नियुक्ती केली आहे.

Related posts: