|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘ओप्पो रेनो-2’ 28 ऑगस्टला होणार लाँच

‘ओप्पो रेनो-2’ 28 ऑगस्टला होणार लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ‘ओप्पो’ 28 ऑगस्ट रोजी आपला ‘ओप्पो रेनो-2’ हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. ओप्पोने ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

‘ओप्पो रेनो-2’ या फोनमध्ये पाठीमागे 4 कॅमेरे, 6.43 इंचाचा एमोलेड डिस्प्ले तसेच क्वालकॉम स्नॅपड्रगन 710 प्रोसेसरचा पॉवर्ड राहणार आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज, 4,065 एमएएच क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. हा फोन प्रथम भारतात लाँच करण्यात येणार आहे. ओप्पो 28 ऑगस्टला एकापेक्षा अधिक फोन लाँच करू शकते, असे आप्पोने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या फोनची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केली नाही.

Related posts: