|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘कांसुलो रिटन्स’ लवकरच लोकांच्या भेटीला

‘कांसुलो रिटन्स’ लवकरच लोकांच्या भेटीला 

प्रतिनिधी/ पणजी

वर्ष 2002 च्या दरम्यान कोंकणी रंगभुमिवर रसिकांच्या मनांत वेगळे स्थान निर्माण करणारा नाटक ‘कांसुला’ हे नाटक आता पुन्हा एकदा ‘कांसुलो रिटन्स’ या नावाने रसिकांच्या मागणीनुसार आम्ही रंगमंचावर घेऊन आलो आहे. अशी माहीती कांसुलो रिटन्स च्या निर्माता सुचिता नार्वेकर यांनी दिली.

पणजी येथील साहीत्य सेवक मंडळ सभागृहात कला चेतना वळवई यांच्यातर्फे आयोजित पत्रकार परीषदेत सुचिता नार्वेकर यांनी ही माहीती दिली. यावेळी त्यांच्यासोबत कलाकार राजदिप नाईक, गायत्री पाटील, व डॉ. नोएल ब्रिट्टो उपस्थित होते.

एका वेगळय़ा रंगात व वेगळय़ा ढंगात हे नाटक आम्ही रसिकांसाठी घेऊन आलो आहोत. कोंकणी रंगभुमिवर पुर्ण व्यवसायिक नाटक होत नाही ही कोंकणी नाटय़ सृष्टीत एक पोकळी होती ती भरुन काढण्याचा कांसुलो रिटन्स या नाटकाच्या माध्यमातून प्रयत्न आम्ही केला आहे. असे नार्वेकर यांनी पुढे सांगितले.

17 वर्षाआधी कांसुलो हे नाटक आले होते व या नाटकाचे 150 पेक्षा अधिक प्रयोग राज्यभर झाले होते. कोंकणी नाटकाची प्रथम सीडी रुपात येण्याचा मानही या नाटकाला मिळाला आहे. आता दर्जेदार नाटक स्वरुपात हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहे. याचा लाभ रसिकांनी घ्यावा. त्याचप्रमाणे एक नविन उपक्रम  म्हणून आम्ही नाटक सुरु होण्यापुर्वी अपघातात सापडलेल्यांना एम्बुलंन्स येण्याअगोदर कसे त्याचे जिवन वाचवावे यावर प्रात्यिक्षक ठेवण्यात आले आहे. डॉ. नोएल ब्रिट्टो हे प्रात्यक्षिक दाखविणार आहे. असे राजदिप नाईक यांनी सांगितले.

कांसुलो रिटन्स या नाटकाचे दिग्दर्शन निलेश महाले यांनी केले आहे. संगीत सिंधुराज कामत यांचे आहे. तर निर्भयभव संस्थेचे सुदेश साळगांवकर यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.

Related posts: