|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पाकच्या अपप्रचाराला काश्मिरी अधिकाऱयांचे प्रत्युत्तर

पाकच्या अपप्रचाराला काश्मिरी अधिकाऱयांचे प्रत्युत्तर 

समाजमाध्यमांवर मांडत आहेत सत्य बाजू : काश्मीर भारतापासून कुणीच हिरावू शकत नसल्याची स्पष्टोक्ती

वृत्तसंस्था/ श्रीनगर

 जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यापासून पाकिस्तान जगभरात भारतविरोधी अपप्रचार फैलाविण्यासाठी समाजमाध्यमांवर बनावट वृत्तांची मदत घेत आहे. सद्यकाळात बनावट चित्रफिती तसेच छायाचित्रांद्वारे जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पाकने चालविला आहे. पण भारताने प्रत्येकवेळी त्याचा कट हाणून पाडत चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकच्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर देण्यातकाश्मीरचे दोन अधिकारी आघाडीवर आहेत.

पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करणारे श्रीनगरमध्ये तैनात आयपीएस अधिकारी इम्तियाज हुसैन हे पुरावे तसेच तर्कांसह समाजमाध्यमांवर पाकच्या अपप्रचारामधील हवा काढून घेत आहेत. ट्विटरवर अत्यंत सक्रीय असणारे हुसैन पाकिस्तानी ट्रोलना स्वतःच्या प्रत्युत्तराने मात देत आहेत.

हुसैन यांनी रविवारी एका पाकिस्तानी डाकूच्या काश्मीरमध्ये भारताच्या विरोधात लढण्याच्या वल्गनेला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. पाकच्या सिंधचा एक डाकू काश्मीरमध्ये लढू इच्छितो. आतापर्यंत जे लोक काश्मीरमध्ये लढण्यासाठी आले होते, ते कमकुवत डाकू होते. पाकिस्तानी सैन्य नेहमीच आपले काम अशा डाकूंना आउटसोर्स करत राहिले आहे. या डाकूची गत पूर्वीच्या डाकूंप्रमाणेच होणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी नमूद केले आहे.

इम्रान, शाह फैजल लक्ष्य

भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानात काळा दिन साजरा करण्याच्या इम्रान खान यांच्या घोषणेवर हुसैन यांनी उपरोधिक टिप्पणी केली आहे. सर्व प्रकारची आक्रमकता, दहशतवाद, चिथावणीनंतरही पाकिस्तान काश्मीर हिसकावू शकत नाहीत. आता त्यांनी ट्विटरवर असे करण्याचा प्रयत्न करावा. माजी आयएएस अधिकारी असलेल्या शाह फैजल यांच्या प्रतिभेसाठी मी त्यांचा प्रशंसक राहिलो आहे. एक नेत्याच्या स्वरुपात शाह फैजल निराशा फैलावू शकत नाहीत. इतिहासाचा केवळ एकच कंगोरा असू शकत नाही. शाह यांना नवे वास्तव स्वीकारावे लागणार असल्याचे हुसैन यांनी म्हटले आहे.

सत्याचा आदर करा

एका विदेशी वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने ट्विट करत काश्मीरच्या रुग्णालयांमधील दूरध्वनी सेवा काम करत नसल्याची तक्रार केली असता शाहिद यांनी त्याला अफवा पसरविणे बंद करण्याचा सल्ला दिला. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच अन्य वैद्यकीय सुविधांच्या प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक दिवसभर सुरू आहेत. कृपया सत्याचा आदर करा. अफवांच्या आधारावर ट्विट करण्यासाठी तुमच्याकडे अद्याप बरेच काही शिल्लक असल्याचे म्हणत शाहिद यांनी संबंधित पत्रकाराला चांगलेच सुनावले आहे.

शाहिद चौधरी ‘संकटमोचक’

जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरल्याचा दुष्प्रचार पाककडून जगभरात बनावट वृत्तांद्वारे केला जात असतानाच आयएस अधिकारी शाहिद चौधरी हे तथ्य तसेच चित्रणाच्या माध्यमातून काश्मीरमधील शांततेची स्थिती जगासमोर मांडत आहेत. चौधरी हे श्रीनगरचे उपायुक्त असून सातत्याने ट्विट करत ते शहरातील सद्यस्थिती मांडत आहेत. तसेच अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत उपलब्ध करत आहेत.

 

पुरस्कार रकमेवर कर भरणार पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करदात्यांसमोर एक उदाहरण मांडले आहे. सोल शांतता पुरस्कारातून मिळालेल्या 1.3 कोटी रुपयांच्या रकमेवर कर आकारला जावा, अशी मोदींनी केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून पुरस्कार रकमेवर कर वसूल केला जावा, असे आवाहन केले होते. सामान्यांप्रमाणे आपणही करू भरू इच्छित असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Related posts: