|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Automobiles » रेनॉल्टच्या ‘ट्रायबर’ कारचे 28 ऑगस्टला लाँचिंग; बुकिंग सुरू

रेनॉल्टच्या ‘ट्रायबर’ कारचे 28 ऑगस्टला लाँचिंग; बुकिंग सुरू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी ‘रेनॉल्ट’ने आपल्या बहुप्रतीक्षित ‘ट्रायबर’ या कारच्या बुकींगला सुरुवात केली आहे. येत्या 28 ऑगस्ट रोजी ‘ट्रायबर’ या सात आसनी कारचे लाँचिंग होणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयात ग्राहकांना या कारची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होणार आहे. या कारची किंमत साधारणतः साडेपाच ते आठ लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्मयता आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा डिलर्सकडे या कारचे ग्राहकांना बुकिंग करता येईल.

ट्रायबरमध्ये 1.0 लिटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन असून त्यातून 72 पीएस सोबत 96 एनएम टॉर्क निर्मिती होते. यामध्ये फाईव्ह-स्पीड ट्रान्समिशन आहे. हे डय़ुएल व्हीव्हीटी सिस्टीमप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. ट्रायबर हे आधुनिक आणि अल्ट्रा-मॉडय़ुलर, इंधनाची बचत करणारे वाहन आहे. याशिवाय मल्टिमीडिया टच स्क्रीनमध्ये मीडियानेव्ह इवोल्यूशन मल्टिमीडिया सिस्टीमशी जोडलेले आहे. हॅण्ड्स-फ्री कार्डमुळे दरवाजे उघड-बंद करता येतात. ट्रायबरमध्ये स्लायडिंग, रिक्लायनेबल, फोल्डेबल आणि टम्बल सेकंड-रो सीट्ससोबत मोठे दरवाजे, सर्वोत्तम स्टोरेज कम्पार्टमेन्ट उपलब्ध आहे.

Related posts: