|Saturday, December 7, 2019
You are here: Home » leadingnews » लोकांना त्रास होईल असं काहीही करू नका : राज ठाकरे

लोकांना त्रास होईल असं काहीही करू नका : राज ठाकरे 

ऑनलाइन टीम /ठाणे : 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य ईडीच्या चौकशीमुळे मुंबई आणि ठाण्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. 22 ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्यास ठाणे बंद करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला होता. परंतु आता मनसेनं ठाणे बंदचं आवाहन मागे घेतलं आहे. मनसे अध्यक्ष राज यांनी लोकांना त्रास होईल असे काही करू नका, असे सांगितल्यामुळे त्यांच्या आदेशानुसार आम्ही बंद पाठी घेत आहोत. त्यांना चौकशीची नोटीस पाठविल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता आणि त्या तीव्र भावनेने आम्ही सरकार विरोधी ठाणे बंदचा इशारा दिला होता. पण त्या दिवशी आम्ही काय करणार आहोत याचा निर्णय मात्र आदल्या दिवशी घेतला जाईल. आज मात्र आम्ही बंद पाठी घेत आहोत, असे अविनाश जाधव यांनी सांगितले.

 

Related posts: