|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » येडीयुराप्पा मंत्रिमंडळाचा विस्तार : 17 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

येडीयुराप्पा मंत्रिमंडळाचा विस्तार : 17 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

ऑनलाइन टीम /बेंगळुरु : 

जवळपास महिनाभराच्या राजकीय नाटय़ानंतर कुमारस्वामींचे काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यात भाजपाला यश आले होते. यानंतर येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी त्यांना महिना लागला आहे. आज, मंगळवारी येडीयुराप्पांच्या 17 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमत न मिळाल्याने येडीयुराप्पा यांनी स्वतःला मुख्यमंत्री घोषित करूनही बहुमत सिद्ध करता आले नव्हते. अखेर काँग्रेस, जेडीएसने आघाडी करत कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता. कुमारस्वामींनी दीड वर्ष रडतखडत सरकार चालविले होते.  

Related posts: