|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Automobiles » ‘ह्युंदाई’च्या ‘ग्रॅन्ड आय 10 एनआयओएस’चे आज लाँचिंग

‘ह्युंदाई’च्या ‘ग्रॅन्ड आय 10 एनआयओएस’चे आज लाँचिंग 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ‘ह्युंदाई’ची ‘ग्रॅन्ड आय 10 एनआयओएस’ ही हचबॅक कार आज भारतात लाँच होणार आहे. ही कार बाजारातील मारुती स्विफ्ट, फॉर्ड फिगो यासारख्या गाडय़ांशी स्पर्धा करणार आहे.

ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध असेल. 5 स्पीड मॅन्युअल्स तर 5 स्पीड ऑटोमोटेड मॅन्यूअल ट्रान्समिशनही या कारमध्ये उपलब्ध आहेत. दोन्ही इंजिन बीएस 6 असण्याची शक्यता आहे. तर कारच्या केबिनमध्ये तुम्हाला अँड्रॉईड ऑटो आणि ऍपल कारप्लेसोबत 8 इंच टचस्क्रीन सोबत मल्टी फंक्शन स्टीयरिंग व्हील, ऑटो क्लायमेट कंट्रोल ,रियर एसी वेंट्स आणि वायरलेस चार्जिंग यासारखे फिचर्स मिळणार आहेत.

प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, कॅसकेडिंग ग्रिल आणि व्ही शेप एलईडी लाईट्स देण्यात आल्या आहे. जुन्या आय 10 पेक्षा ही कार अधिक आकर्षक आहे. ही कार बाजारात आल्यानंतरही जुन्या आय 10 मॉडेलची विक्रीही सुरूच राहणार आहे. ही थर्ड जनरेशन कार असून, तिची किंमत तब्बल पाच लाखांपासून पुढे असणार आहे.