|Friday, December 13, 2019
You are here: Home » उद्योग » मोतीलाल ओसवालतर्फे चार नवीन इंडेक्स फंड

मोतीलाल ओसवालतर्फे चार नवीन इंडेक्स फंड 

वृत्तसंस्था / मुंबई

मोतीलाल ओसवाल ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने चार नवीन इंडेक्स फंड गुंतवणूकदारांसाठी खुले केले आहेत. मोतीलाल ओसवाल मिडकॅप वन फिप्टी इंडेक्स फंड, मोतीलाल ओसवाल निफ्टी 500 इंडेक्स फंड, मोतीलाल ओसवाल निफ्टी बँक इंडेक्स फंड, मोतीलाल ओसवाल निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स फंड असे या चार फंडांची नावे आहेत. हे मुदतमुक्त फंड 19 ऑगस्टपासून गुंतवणुकीसाठी खुले झाले असून 30 ऑगस्टला बंद होणार आहेत.

मोतीलाल ओसवाल निफ्टी 500 इंडेक्स फंडात निफ्टी 500 इंडेक्सच्या कामगिरीआधारे परतावा मिळविला जाणार आहे. हा कमी खर्च असलेला पहिला मल्टी कॅप फंड असून त्यात विविधताही आहे. यातील गुंतवणूक प्रामुख्याने लार्ज कॅप समभागांमध्ये गुंतविली जाणार आहे. त्यामुळे स्थिर परताव्याची हमी आणि जोखीमही कमी झाली आहे. यातील 20 टक्के निधी वृद्धी आणि उच्च परतावा देऊ शकणाऱया मिड-कॅप आणि स्मॉल कॅपमध्येही गुंतविला जाणार आहे.

मोतीलाल ओसवाल निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फंड हा देशातील पहिला मिडॅकप 150 इंडेक्स फंड आहे. या फंडातील परतावा निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सशी संलग्न राहणार आहे. हा फंड मुदतमुक्त (ओपन एंडेड) असून निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्सच्या आधारे वाटचाल करणार आहे.

मोतीलाल ओसवाल निफ्टी बँक इंडेक्स फंड हा देशातील पहिला निफ्टी बँक इंडेक्स फंड ठरणार आहे. निफ्टी बँक इंडेक्सआधारे परतावा मिळविला जाणार असून प्रामुख्याने अधिक तरलता असलेल्या मोठय़ा बँकांच्या समभागांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे.

Related posts: