|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Automobiles » मारुती सुझुकीच्या ‘XL 6’ एमपीव्हीचे आज लाँचिंग

मारुती सुझुकीच्या ‘XL 6’ एमपीव्हीचे आज लाँचिंग 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सुप्रसिद्ध स्वदेशी कार उत्पादक कंपनी ‘मारुती सुझुकी’ आज प्रिमियम श्रेणीतील एमपीव्ही ‘एक्सएल 6’ ही कार लाँच करणार आहे. या कारची टक्कर महिंद्राच्या मराझोशी होणार आहे. ही कार मारुतीच्या ‘नेक्सा’ या दालनात विकण्यात येणार असून, कंपनीने या कारची आगाऊ बुकिंगही सुरू केली आहे.

ही कार प्रिमियम श्रेणीत असल्याने या कारची किंमत इर्टीगा कारपेक्षा अधिक असणार आहे. सुरुवातीला ही कार zeta आणि alpha या दोन व्हेरिअंटमध्ये विकण्यात येईल. या कारमध्ये 1.5 लीटरचे k15b पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे इंजिन हायब्रिड सिस्टिमसह असेल. हे इंजिन 105 पीएसची ताकद आणि 138 एनएम टॉर्क उत्पन्न करेल. मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 19.01 kmpl आणि ऍटोमॅटीक ट्रान्समिशनमध्ये 17.99 kmpl चे मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. या कारची किंमत 9.5 लाख ते 11.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते.