|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » देशभक्त ‘प्रियांका चोप्रा’ विरोधात पाकची तक्रार

देशभक्त ‘प्रियांका चोप्रा’ विरोधात पाकची तक्रार 

सदिच्छादूत पदावरून हटविण्याची मागणी

संयुक्त राष्ट्रसंघ

 पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राला सदिच्छादूत पदावरून हटविण्याची मागणी संयुक्त राष्ट्रसंघात केली आहे. प्रियांका चोप्रा भारत सरकार तसेच सैन्याकडून घेण्यात आलेल्या निर्णयाला पाठिंबा देत असल्याने तिचे पद काढून घेतले जावे, असे मजारींनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ सदिच्छादूताच्या शांती आणि दयाभावनेच्या तत्वांच्या विरोधात प्रियांकाचं वर्तन असल्याचा कांगावा पाकने केला आहे.

एका कार्यक्रमात पाकिस्तानी महिलेने प्रियांकावर युद्धाला चिथावणी दिल्याचा आरोप केला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छादूत असूनही आण्विकयुद्धाला चिथावणी देत असल्याचा आरोप महिलेने प्रियांकाच्या विरोधात केला होता. बालाकोट येथील कारवाईनंतर प्रियांका चोप्राने भारतीय वायुदलाच्या समर्थनार्थ ‘जय हिंद’ असा ट्विट केला होता. याच ट्विटचा संदर्भ घेत महिलेने प्रियांकाच्या विरोधात गरळ ओकली होती.

Related posts: