|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चतुर्थी काळात खबरदारी घेण्याबाबत बैठक

चतुर्थी काळात खबरदारी घेण्याबाबत बैठक 

प्रतिनिधी/ म्हापसा

येत्या गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यासाठी म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर यांच्या नेतृत्वाखाली खास बैठक पार पडली.

यावेळी बार्देश तालुक्यातील 33 गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, पोलीस अधिकारी, विविध राज्यातील सरकारी अधिकारीवर्ग उपस्थित होते. याप्रसंगी विविध गणेशोत्सवातील अध्यक्ष व पदाधिकारी वर्गांनी आपापल्या सूचना मांडल्या. म्हापशात प्रामुख्याने 4 सार्वजनिक गणेशोत्सव असून या पदाधिकाऱयांनी गणेशोत्सवाच्या काळात म्हापशात मोठय़ा प्रमाणात एकच गर्दी होते. त्यामुळे त्याचा ताण पोलीस व ट्राफिक पोलिसावर येतो. म्हापशात पार्किंगसाठी खास व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी म्हापसा गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी केली.

म्हापसा कदंब बसस्थानकावर काही प्रमाणात खुली जागा आहे तिथे दुचाकी पार्किंगसाठी सोय करावी. कार्व्हालो पेट्रोलपंपजवळ खुल्या जागेत चारचाकी गाडय़ा पार्किंगसाठी ठेवाव्यात अशी सूचना करण्यासाठी याबाबत हा प्रश्न पालिका बैठकीत घेऊन यावर विचार विनिमय करण्याचे उपजिल्हाधिकाऱयांनी सांगितले. कळंगूट भागातही मोठय़ा प्रमाणात वाहतूक केंडी होते. येथे अतिरिक्त पोलीस फौजफाटा घालावा अशी मागणी कळंगूट शांतादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग मठकर यांनी सांगितले.

चतुर्थीच्या काळात बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. या गर्दीचा फायदा घून चोरटे पाकीटमारी करतात. त्यामुळे खाकीवर्दीतील पोलिसाबरोबरच साध्या वेषातील पोलीस फौजफाटा म्हापशात तैनात करावा अशी मागणी यावेळी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी केली. यावेळी अन्य विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपजिल्हाधिकारी श्री. केरकर यांनी यात लक्ष घालून ह्या समस्या चतुर्थीच्या काळात सोडविण्याचे आश्वासन दिले.

Related posts: