|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

नवी दिल्ली येथील रविदास मंदिर अनधिकृत असल्याचे सांगत तोडण्याची कारवाई करण्यावरून रामलीला मैदानात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून रामलीला मैदानात आंदोलन सुरू होते. यावेळी दगडफेक करण्यात आल्याने त्यांना रोखण्यासाठी पोलिस बळाचा वापर करण्यात आला. याचबरोबर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आहे.

रविदास मंदिर तोडण्याच्या विरोधत रामलीला मैदानात बुधवारी सायंकाळी दलित आंदोलक मोठय़ा प्रमाणावर जमले होते. हजारो लोकांनी तोडलेल्या मंदिराकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या दरम्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तुगलकाबाद रोडवर 100 हून अधिक गाडय़ांच्या काचा फोडण्यात आल्या.

 

Related posts: